पाककडून भारताच्या ४३ मासेमारांना अटक

पाक आणि श्रीलंका सातत्याने भारतीय मासेमारांना सागरी सीमा ओलांडली म्हणून अटक करत असतांना सरकार मासेमारांना सागरी सीमेविषयी योग्य मार्गदर्शन का करत नाही ?

कराची (पाकिस्तान) – पाकच्या नौदलाने त्यांच्या सागरी सीमेत प्रवेश केल्याचे सांगत भारताच्या ४३ मासेमारांना अटक केली आहे. या व्यतिरिक्त ६ नौकाही जप्त केल्याची माहिती पाकिस्तानच्या नौदलाकडून देण्यात आली. यापूर्वीही अनेकदा भारतीय मासेमारांना सागरी सीमा ओलांडल्यावरून पाकिस्तानी नौदलाने अटक केली होती.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एप्रिल मासामध्ये ४ टप्प्यांमध्ये ३६० भारतीय मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने २५० भारतीय मासेमारांची ३ टप्प्यांमध्ये सुटका केली होती.


Multi Language |Offline reading | PDF