झारखंड येथील सामूहिक बलात्काराच्या वेळी मुलींना न वाचवणारे फादर अल्फांसो दोषी

पाद्रयांचे हे खरे स्वरूप भारतातील प्रसारमाध्यमे आणि पुरो(अधो)गामी नेहमीच दडपतात !

खुंटी (झारखंड) – येथील कोचांग गावामध्ये नक्षलवाद्यांनी एका खासगी संस्थेच्या ५ अल्पवयीन कार्यकर्तींचे अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या वेळी फादर अल्फांसो यांनी नक्षलवाद्यांपासून मुलींना वाचवण्याऐवजी एका ननलाच वाचवले होते. पोलिसांनी या प्रकरणी फादर अल्फांसो यांच्यासह ४ जणांना अटक केली होती. या प्रकरणी फादर अल्फांसो यांना न्यायालयाने दोषी ठरवले असून १५ मे या दिवशी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

मानव तस्करीच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी गेल्या वर्षी २१ जून या दिवशी या मुली कोचांग गावामध्ये गेल्या होत्या. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जुनस तुडू याने ‘पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया’ या नक्षलवादी संघटनेच्या नक्षलवाद्यांना बलात्कारासाठी प्रवृत्त केले होते.


Multi Language |Offline reading | PDF