रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला ह.भ.प. संजय कोटणीस यांची सहपरिवार सदिच्छा भेट

१. ह.भ.प. संजय कोटणीस, २. श्री. धनंजय कोटणीस आणि त्यांचे सहकारी यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना श्री. अमोल हंबर्डे (सर्वांत उजवीकडे)

रामनाथी (फोंडा) – सांगली येथील संत प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव ह.भ.प. संजय कोटणीस, कनिष्ठ चिरंजीव श्री. धनंजय कोटणीस आणि कुटुंबीय यांनी ४ मे २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे यांनी त्यांना सनातनच्या आश्रमात चालणारे राष्ट्र-धर्म यांविषयीचे कार्य आणि आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली.

या प्रसंगी सनातनचे पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी ह.भ.प. संजय कोटणीस यांचे औक्षण केले, तसेच सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी शाल, श्रीफळ अन् भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ याही उपस्थित होत्या.

सनातन आश्रमात धर्माचे रक्षण आणि प्रचार यांचे कार्य अविरत चालू आहे, याचा आनंद वाटतो ! – ह.भ.प. संजय कोटणीस

सनातनचा आश्रम अप्रतिम आहे. आश्रमात धर्माचे रक्षण आणि प्रचार यांचे कार्य अविरत चालू आहे, हे पाहून आनंद वाटतो. सर्वांना पहाण्यासाठी ठेवलेल्या सूक्ष्म-जगताविषयीच्या ठेव्यातून धर्माचा प्रसार होऊन सर्वांना ज्ञान मिळेल, अनुभवास येईल आणि याकडे वळण्यास आरंभ होईल, असे वाटते.

हिंदूंना जागृती करण्याचे कार्य पाहून मन समाधानी झाले ! – हरि रामचंद्र फडणीस (ह.भ.प. संजय कोटणीस यांचे सहकारी)

हिंदूंना जागृत करण्यासाठी आपण करत असलेले कार्य पाहून मन समाधानी झाले. आश्रमातील स्वच्छता आणि येथील लोकांची साधना पाहून मन तृप्त झाले. सूक्ष्म-जगताशी संबंधित प्रदर्शन पाहून मनही तृप्त झाले.

चिमड संप्रदायाचे प.पू. यरगट्टीकर महाराज हे प.पू. तात्या महाराज कोटणीस यांचे गुरु होत. प.पू. निबर्गीकर महाराज हेही याच गुरुपरंपरेतील आहेत. सांगली येथे प.पू. यरगट्टीकर महाराज, प.पू. तात्या महाराज कोटणीस आणि प.पू. निबर्गीकर महाराज यांची एकत्रित समाधीही आहे.

प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज आणि कुटुंबीय यांचा संक्षिप्त परिचय

सांगली येथे प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज यांचा प्रसिद्ध मठ आहे. ह.भ.प. संजय कोटणीस हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि श्री. धनंजय कोटणीस हे कनिष्ठ चिरंजीव आहेत. प.पू. दादा महाराज कोटणीस हे प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज यांचे वडील आणि प.पू. तात्या महाराज कोटणीस हे आजोबा होत. प.पू. तात्या महाराज कोटणीस यांनी सांगली येथे पहिल्यांदा कीर्तन परंपरा चालू केली असून मागील १५० वर्षांपासून ती चालू आहे. प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज यांच्या मठात प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन केले जाते. प.पू. गुरुनाथ कोटणीस महाराज गावोगावी कीर्तनासाठी जातात, तेव्हा ह.भ.प. संजय कोटणीस त्यांचे कार्य सांभाळतात.


Multi Language |Offline reading | PDF