लालबाग (मुंबई) येथील पुरातन हनुमान मंदिर अनधिकृत ठरवून मुंबई महानगरपालिकेने तोडले

मंदिरांना अनधिकृत ठरवून पाडणारे प्रशासन अनधिकृत मशिदींवर कारवाई करायला का घाबरते ? अशा प्रकारे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि हिंदूंना कायद्याचा बडगा, हीच या देशातील धर्मनिरपेक्षता आहे का ? बहुसंख्य असूनही हिंदूंना दुय्यम लेखणारी यंत्रणा हिंदूंनी का पोसावी ? त्याऐवजी आपल्या श्रद्धास्थानांचा आदर करणारे हिंदु राष्ट्र स्थापन करायला हवे !

तोडण्यात आलेले पुरातन हनुमान मंदिर

मुंबई, ७ मे (वार्ता.) – लालबाग येथील आयकर भवनच्या बाजूला असलेले पुरातन हनुमान मंदिर अनधिकृत ठरवून ३ मे या दिवशी मुंबई महानगरपालिकेने तोडले. बुलडोझरने मंदिराच्या भिंती, दरवाजे आणि मंदिराचे छत तोडण्यात आले. याविषयी भाविकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF