सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे योगगुरु स्वामी आनंद गिरी यांना महिलांना मारहाण केल्याच्या प्रकरणी अटक

नवी देहली – प्रयागराज येथील निरंजनी आखाड्याशी संबंधित योगगुरु स्वामी आनंद गिरी यांना ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरामध्ये महिलांना मारहाण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. स्वामी आनंद गिरी यांचे गुरु महंत नरेंद्र गिरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘वर्ष २०१६ मध्ये एका सत्संगाच्या वेळी ही मारहाण करण्यात आली होती’, असा त्यांच्यावर आरोप आहे. याविषयी स्वामी आनंद गिरी यांनी म्हटले होते की, ही मारहाण नव्हती. आशीर्वाद देतांना त्यांच्या पाठीवर थाप मारली होती; मात्र त्या महिलांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला.


Multi Language |Offline reading | PDF