फेसबूकवर हिंदु महिलांच्या अश्‍लील छायाचित्रांची ‘पोस्ट’ टाकणार्‍या धर्मांधाच्या विरोधात जळगाव येथे गुन्हा नोंद !

धर्मांधाकडून हिंदु महिलांची अश्‍लील छायाचित्रे ‘पोस्ट’ झाल्यावर ‘यामुळे धार्मिक तणाव वाढेल’, असे पुरो(अधो)गामी आता का म्हणत नाही ? आता ते गप्प का ?

जळगाव, ७ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील धर्मांध अबरार खान याने त्याच्या फेसबूक खात्यावर हिंदु महिलांच्या अश्‍लील छायाचित्रांसह अवमानकारक लिखाणाची ‘पोस्ट’ प्रसिद्ध केली होती. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने श्री. संदीप ज्ञानेश्‍वर भोई या हिंदुत्वनिष्ठाने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानुसार खान याच्यावर कलम २९५(अ) आणि आयटी अ‍ॅक्ट कलम ६७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अबरार खान याने फेसबूक खात्यावर हिंदु महिलांचे अर्धनग्न छायाचित्र आणि त्याखाली ‘ए देखो, मुस्लीम महिला के बुरखेपर हंसनेवालो, सोचो और बताओ ये कौनसा धर्म है ?’ असे लिखाण असलेली ‘पोस्ट’ ठेवली आहे. या प्रकरणी श्री. भोई यांनी ४ मे या दिवशी जळगाव येथे ही तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानुसार खान याच्या विरोधात ५ मेच्या रात्री विलंबाने गुन्हा नोंद करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF