हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या बैठकीतून समितीच्या कार्यात सहभागी होण्याचा धर्माभिमान्यांचा मनोदय !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’

कोलकाता आणि जमशेदपूर येथे हिंदु जनजागृती समितीकडून उपक्रमांचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभु गवारे (डावीकडून तिसरे) आणि अन्य धर्माभिमानी

कोलकाता (बंगाल) – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला हिंदु मिशन, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभु गवारे  यांनी संबोधित केले. या बैठकीत हिंदूंची सद्यःस्थिती, धर्मशिक्षणाची आवश्यकता, राष्ट्रीय हिंदू अधिवेशन आणि हिंदूसंघटनाकरता समिती करत असलेले प्रयत्न यांविषयी माहिती देण्यात आली. उपस्थित धर्माभिमान्यांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला. या बैठकीला राष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष संदीप चौधरी, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे संघटन सचिव अमोल सरकार, हिंदु मिशनचे अध्यक्ष डॉ. अरुण कुमार गिरी, हिंदु मिशनचे हावडा समन्वयक श्री. दिप्तेंदू बोराल आदी धर्माभिमानी उपस्थित होेते.

जमशेदपूर (झारखंड) येथे मंदिर स्वच्छता

सामूहिक प्रार्थना करून देवतेला साकडे घालतांना धर्माभिमानी

जमशेदपूर (झारखंड) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र जागृती अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत येथील भाटिया वस्ती, कदमा येथील शिव मंदिरात अलिकडेच मंदिर स्वच्छता उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामध्ये हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

सामूहिक प्रार्थना करून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी समितीचे श्री. आलोक पांडेय म्हणाले, ‘‘स्वच्छ आणि पवित्र देवालयांच्या माध्यमातूनच संपूर्ण समाजात मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रवाहित होऊ शकते. अशा प्रकारे सामूहिक सहभागाद्वारे मंदिरांना भ्रष्ट लोक आणि सरकारे यांच्या तावडीतून मुक्त करू शकतो, तसेच त्यांचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो.’’

सामूहिक प्रार्थना आणि देवतेला साकडे !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दिर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावे, यासाठी जमशेदपूर येथील शिव मंदिरामध्ये सामूहिक प्रार्थना करून देवतेला साकडे घालण्यात आले. याप्रसंगी उपस्थित भाविकांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच मंदिराच्या प्रांगणात त्यांच्या जीवनावर आधारित लावण्यात आलेल्या २ दिवसीय फलक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही उपस्थितांना करण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now