आगोंद येथील श्री हनुमान मंदिराचे अर्धवट स्थितीतील बांधकाम एका ख्रिस्त्याने पाडल्याने हिंदूंमध्ये संताप !

  • एका हिंदूने ख्रिस्त्यांचे श्रद्धास्थान पाडले असते, तर निधर्मी प्रसारमाध्यमांनी याचे आंतरराष्ट्रीय वृत्त बनवून भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचे चित्र रंगवले असते, हे लक्षात घ्या !
  • मंदिराचे बांधकाम पाडणारे ख्रिस्ती हे  पोर्तुगीज काळात गोव्यातील मंदिरे पाडल्यानंतर आनंद व्यक्त करणार्‍या झेवियरचेच वंशज !

काणकोण, ६ मे (वार्ता.) – काराशिरामळ, आगोंद येथील श्री हनुमान मंदिराचे अर्धवट स्थितीतील बांधकाम एका ख्रिस्त्याने पाडल्याने येथील हिंदूंमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी काणकोण कोमुनिदादच्या अध्यक्षांनी मध्यस्थी केल्यानंतर संबंधित ख्रिस्त्याने मंदिराचे पाडलेले बांधकाम पुन्हा बांधून देण्याचे आश्‍वासन दिल्यावर येथील वातावरण शांत झाले.

सविस्तर वृत्त असे की, वर्ष १९७४ मध्ये येथील कोमुनिदादच्या भूमीत काही युवकांनी पुढाकार घेऊन श्री हनुमानाचे मंदिर उभारण्यासाठी ३ मीटर उंचीच्या भिंती उभारल्या; मात्र आर्थिक साहाय्याभावी हे काम अर्धवटच राहिले. त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. याचा गैरलाभ उठवत आगोंद (इगर्जवाडा) येथील आयवो फर्नांडिस याने काणकोण कोमुनिदादची उपरोल्लेखित मंदिराजवळची दीड सहस्र चौरस मीटर भूमी बळकावून त्या ठिकाणी अनधिकृतपणे घर बांधले, असे समजते. या ठिकाणच्या अपूर्ण श्री हनुमान मंदिराकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे पाहून त्या ख्रिस्त्याने ३ मीटर उंच उभारलेल्या मंदिराच्या भिंती एका रात्रीत पाडून या भागाचे सपाटीकरण केले. ही घटना स्थानिकांच्या लक्षात आल्यावर याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काणकोण उपजिल्हाधिकार्‍यांनी या घटनेची गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. या प्रकरणी काणकोण कोमुनिदादचे अध्यक्ष श्री. शरद नाईक गावकर यांनी द्वयी पक्षांमध्ये मध्यस्थी करून या प्रकरणावर तोडगा काढण्याविषयी हिंदूंना आश्‍वस्त केले. यानंतर आयवो फर्नांडिस याने मंदिराच्या पाडलेल्या भिंती बांधून देण्याचे मान्य केल्यानंतर येथील वातावरण शांत झाले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now