पुलवामा येथे मतदानकेंद्रात ग्रेनेडचा स्फोट

निवडणुकीमध्ये हिंसाचार होऊ देणारा जगातील एकमेव देश भारत ! अशी स्थिती होऊ देणारी लोकशाही निरर्थक !

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – लोकसभा निवडणुकीच्या ५ व्या टप्प्याचे मतदान ६ मे या दिवशी झाले. ७ राज्यांतील एकूण ५१ जागांसाठी हे मतदान झाले. या वेळी पुलवामा येथे मतदानकेंद्रावर आतंकवाद्यांकडून ग्रेनेड फेकण्यात आल्याने त्याचा स्फोट झाला; मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आदल्या दिवशी म्हणजे ५ मे या दिवशी राज्यातील शोपियां आणि पुलवामा येथे अनेक ठिकाणी दगडफेकीसह जाळपोळीच्या घटना घडल्या. या वेळी धर्मांधांना पांगवण्यासाठी सुरक्षारक्षकांनी पॅलेट गनचा वापर केला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनांमुळे मतदानकेंद्रावरील अनेक कर्मचारी घायाळ झाले. धर्मांधांनी काही ठिकाणी सरकारी इमारतींना आग लावली. (केवळ आतंकवादीच नाही, तर काश्मीरमधील धर्मांधही आतंकवादी कारवाया करत असल्याने त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश सरकार सैन्याला का देत नाही ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now