(म्हणे) ‘रमझानच्या काळात आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाई थांबवावी !’

मेहबूबा मुफ्ती यांची या वर्षीही देशद्रोही मागणी

  • गेल्या वर्षी रमझानच्या काळात सैनिकी कारवाई थांबवून भाजप सरकारने सैन्याची कुचंबणा केली होती. या वेळी सरकारने राष्ट्रहितास प्राधान्य देऊन मुफ्ती यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवावी, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !
  • जिहादी आतंकवाद्यांना मोकळीक देण्याचा प्रयत्न करणार्‍या आणि सातत्याने देशविरोधी विधाने करणार्‍या मेहबूबा मुफ्ती यांना कारागृहात डांबण्याचे धाडस भाजप सरकार का दाखवत नाही ? पाकवर सर्जिकल स्ट्राईक करणार्‍या सरकारला राष्ट्रविरोधकांवर कारवाई करण्यास काय अडचण येते ?

श्रीनगर – रमझानच्या काळात मुसलमान दिवसरात्र प्रार्थना करत असतात, तसेच मशिदीत जात असतात. (असे असले, तरी रमझानच्या काळात आतंकवादी हिंसक कारवाया करतात, तसेच आतंकवाद्यांच्या तालावर नाचणारे जिहादी हे सैनिकांवर दगडफेकही करतात ! मुफ्ती याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत ! – संपादक) त्यामुळे रमझानच्या पवित्र मासामध्ये सैन्य करत असलेली आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाई थांबवण्यात यावी. (रमझानच्या काळात आतंकवाद्यांनी सैनिकांवर आक्रमण करायचे; मात्र सैनिकांनी हातावर हात धरून बसायचे, असे मुफ्ती यांना वाटते का ?  – संपादक) गेल्या वर्षी रमझानमध्ये केंद्र सरकारने असा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणेच यंदाही तो घेण्यात यावा. (एकदा चूक केली, तर ती सातत्याने करावी, असे मेहबूबा मुफ्ती यांना वाटते का ? – संपादक) त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना एक मास तरी शांतता मिळेल, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. (अशी कायमची शांतता मिळावी; म्हणून ‘राज्यातील जिहादी आतंकवादी आणि दगडफेक करणारे धर्मांध यांना कायमची अद्दल घडवा’, अशी मेहबूबा मुफ्ती यांनी कधी मागणी केली आहे का ? पाकचा समूळ नायनाट करावा, तेथील आतंकवाद्यांची सर्व प्रशिक्षण केंद्रे नष्ट करावीत, अशी मागणी त्यांनी कधी केली आहे का ? – संपादक) मेहबूबा मुफ्ती यांनी आतंकवाद्यांनाही ‘रमझानच्या काळात आक्रमण करू नका’, असे आवाहन केले आहे. (‘रमझानच्या काळात आक्रमणे करू नका आणि अन्य वेळेस करा’, असे मेहबूबा मुफ्ती यांना म्हणायचे आहे का ? आतंकवाद्यांनी आतंकवाद सोडून द्यावा, अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी आतापर्यंत कधी केली आहे का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF