भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणांची ममता बॅनर्जी यांच्याकडून ‘शिव्या’ म्हणून हेटाळणी !

  • बंगालमध्ये ममता (बानो) बॅनर्जी यांची एकाधिकारशाही चालू असून आणखी किती दिवस हिंदू ती खपवून घेणार ?
  • ममता(बानो) बॅनर्जी यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा या शिव्याच वाटणार ! अशांच्या विरोधात हिंदूंनी तक्रारी प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबण्यासाठी पोलिसांवर दबाव निर्माण केला पाहिजे !
  • हिंदूबहुल देशात केवळ पक्षद्वेषामुळे मर्यादापुुरुषोत्तम श्रीरामाच्या जयघोषाला शिव्या म्हणणारे या देशात रहाण्याच्या पात्रतेचे आहेत का ? याचा विचार हिंदू कधी करणार ?

कोलकाता – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या भाजपच्या कार्यकर्त्यांवर संतापून ‘तुम्ही शिव्या देणे का थांबवले ?’ असे म्हटल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. बंगालमधील भाजपच्या ट्विटर खात्यावर हा व्हिडिओ ‘शेअर’ करण्यात आला आहे. ‘तुम्हाला बंगालमध्येच रहायचे आहे, हे लक्षात घ्या’, अशा प्रकारची धमकीही बॅनर्जी यांनी संबंधितांना दिली. (भविष्यात ममता (बानो) बॅनर्जी यांच्या राज्यात हिंदूंवर विविध निर्बंध लादल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक)

बंगाल येथील चंद्रकोणमधल्या आरामबाग येथील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास प्रारंभ केला. थोड्या वेळाने ममता बॅनर्जी गाडीतून कार्यस्थळी पोचल्या. बॅनर्जी यांना पाहून भाजपचे कार्यकर्ते तेथून निघून जात होते; मात्र तत्पूर्वी ‘जय श्रीराम’च्या घोषणा ऐकून संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही शिव्या देणे का थांबवले ? देत रहा.’’


Multi Language |Offline reading | PDF