साधनेची तळमळ असलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची पर्वरी, गोवा येथील कु. आस्था शेखर केरकर (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आस्था शेखर केरकर ही एक आहे !

कु. आस्था केरकर

३१.१२.२०१७ या दिवशी मी काही कामानिमित्त घरी गेले होते. तेथे माझी भाची (बहिणीची मुलगी) कु. आस्था शेखर केरकर हीसुद्धा आली होती. तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठण्यासाठी मी काय प्रयत्न करायला हवेत ?, असे जिज्ञासेने विचारणारी कु. आस्था !

मी आस्थाला म्हणाले, तुझ्या वर्गात चि. श्रीरंग सुदीश दळवी आहे ना, तो त्याच्या आईसह रामनाथी आश्रमात रहायला येतो. त्याचा आध्यात्मिक स्तर ६१ टक्के आहे. (श्रीरंगचा आताचा आध्यात्मिक स्तर ६३ टक्के आहे. – संकलक) त्या वेळी ती लगेचच म्हणाली, मावशी, मी त्याच्यापेक्षा आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ मागे आहे ना ? मलाही त्याच्यासारखा ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठायचा आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल ? मी अजून कुठे अल्प पडते ? तिच्या या प्रश्‍नांमुळे मला तिच्यातील तळमळ आणि जिज्ञासू वृत्ती शिकायला मिळाली. (तिला तिचा आध्यात्मिक स्तर ५३ टक्के असल्याचे ठाऊक आहे.)

२. नामजप अन् प्रार्थना यांविषयी जाणून घेणे आणि मावशीच्या भ्रमणभाषमधील गुरुदेवांच्या आवाजातील मार्गदर्शन (ऑडिओ) अंतर्मुखतेने ऐकणे

मी तिला कोणता नामजप करायला हवा ? प्रार्थना कशी करावी ? कृतज्ञता कशी व्यक्त करावी ?, हे सांगितले अन् तिच्याकडून ते करवून घेतले. नंतर आमच्यात पुढील संभाषण झाले.

आस्था : मावशी, देवाशी कसे बोलायचे असते ? हे बाबा (परात्पर गुरु डॉक्टर) माझ्याशी बोलणार का ?

मी : हो

आस्था (आनंदून) : मला त्यांचा आवाज ऐकायचा आहे. मला त्यांना बघायचे आहे.

मी : त्यांच्या आवाजातील ध्वनीमुद्रण (ऑडिओ) माझ्याकडे आहे. ते मी तुला ऐकवते.

त्यानंतर घरातील कामांमुळे मी तिला गुरुदेवांच्या आवाजातील मार्गदर्शन ऐकवायला विसरले. तिने २ – ३ वेळा मला त्याची आठवण रून दिली. मी तिला ते मार्गदर्शन ऐकण्यासाठी भ्रमणभाष दिला. तेव्हा ती कानात इअरफोन घालून अंतर्मुखतेने ते ऐकत होती. त्यातून गुरुदेवांना काय अपेक्षित आहे ?, हे तिला कळत असल्याचे जाणवले.

३. गुरुदेवांना भेटण्याची ओढ असणे

मी आश्रमात जायला निघाल्यानंतर ती मला म्हणाली, मला आश्रमात त्या बाबांना (परात्पर गुरु डॉक्टरांना) भेटायला यायचे आहे. मला ते भेटतील का ? आम्ही आता आश्रमात येऊन त्यांना भेटून लगेचच परत येऊ शकतो का ? यातून तिची आश्रम पहाण्याची आणि गुरुदेवांना भेटण्याची तळमळ दिसून आली.

४. मी तिला स्वभावदोष-निर्मूलन प्रकिया कशी राबवावी ?, स्वतःमध्ये कसे पालट करावेत ?, याविषयी सांगितल्यावर तिने ते व्यवस्थित समजून घेतले.

५. कु. आस्थाचे स्वभावदोष

अ. हट्टीपणा

आ. लाजाळूपणा

इ. स्वतःला श्रेष्ठ समजणे

– कु. सुषमा पेडणेकर (कु. आस्था हिची मावशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF