स्वामी आत्मबोधानंद यांचे उपोषण १९४ दिवसांनंतर मागे

‘राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन’च्या महासंचालकांकडून मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन

  • अशी कितीही आश्‍वासने दिली, तरी ती पूर्ण होण्याची शक्यता अल्पच आहे, हे आतापर्यंतच्या उदाहरणांवरून लक्षात येते !
  • आश्‍वासन द्यायचेच होते, तर त्यासाठी एका साधूला १९४ दिवस उपोषण करण्यास का लावले ?

हरिद्वार (उत्तराखंड) – येथे गंगानदीची स्वच्छता आणि अन्य मागण्यांसाठी गेल्या १९४ दिवसांपासून उपोषण करत असलेले ‘मातृसदन आश्रमा’चे २६ वर्षीय स्वामी आत्मबोधानंद यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले आहे. ‘राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन’चे (एन्एम्सीजीचे) महासंचालक राजीव रंजन मिश्रा यांनी लेखी आश्‍वासन दिल्यावर स्वामींनी उपोषण मागे घेतले. ‘जर आश्‍वासनांप्रमाणे कृती झाली नाही, तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल’, असे ‘मातृसदन’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

१. राजीव मिश्रा यांच्या आश्‍वासनांनुसार रायवालापासून भोगपूरपर्यंत गंगानदीमध्ये वाळू उपसा करण्यावर बंदी घालणे, गंगानदीच्या ५ किमी परिसरामध्ये लावण्यात आलेले ‘स्टोन क्रशर’ (खडी फोडण्याचे यंत्र) बंद करणे आणि गंगानदीवरील विद्युत् प्रकल्पांचे पुन्हा समीक्षण करून त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

२. स्वामी आत्मबोधानंद यांनी २७ एप्रिलपासून जल त्याग करण्याची चेतावणी दिली होती, तेव्हा मिश्रा यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर २ मेपर्यंत त्यांनी ते पुढे ढकलले होते.


Multi Language |Offline reading | PDF