काश्मीरमध्ये भाजप नेत्याची आतंकवाद्यांकडून हत्या

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट करण्याचा प्रयत्न गेल्या ५ वर्षांत भाजपने न केल्याचाच हा परिणाम आहे ! काँग्रेस असो कि भाजप दोघांनीही आतंकवाद आणि नक्षलवाद नष्ट केला नाही, ही वस्तूस्थिती आहे !

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथे भाजपचे ६० वर्षीय नेते गुल महंमद मीर यांची जिहादी आतंकवाद्यांनी ५ गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. ४ मेच्या रात्री ३ आतंकवादी मीर यांच्या घरात घुसले आणि यांनी त्यांच्या गाडीची चावी मागितली. गाडी घेऊन जातांना त्यांनी मीर यांना गोळ्या घातल्या. मीर हे अनंतनाग जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष होते. त्यांना या परिसरात ‘अटल’ नावाने ओळखले जात होते.


Multi Language |Offline reading | PDF