येच्युरी यांनी स्वतःचे नाव पालटून ‘रावण’ ठेवावे ! – योगऋषि रामदेवबाबा

सीताराम येच्युरी यांच्याविरोधात हरिद्वार येथे गुन्हा नोंद

हरिद्वार (उत्तराखंड) – निवडणूक आयोगाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्युरी यांची उमेदवारी रहित करावी आणि त्यांची रवानगी तुरुंगात करावी. कम्युनिस्टवाले देवाला मानत नाहीत, तरीही त्यांनी येच्युरी यांचे नाव ‘सीताराम’ असे ठेवले आहे. ‘रामायण आणि महाभारत काल्पनिक आहे’, असे त्यांना वाटते, तर मग हे नाव तरी का ठेवले? त्यांनी नाव पालटून रावण ठेवावे, अशी मागणी योगऋषि  रामदेवबाबा यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी येच्युरी यांनी ‘हिंदू हिंसक आहेत, रामायण आणि महाभारत हे त्याचे पुरावे आहेत’, अशा आशयाचे विधान केले होते. त्यावरून हरिद्वारमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा प्रकारचे गुन्हे सर्वत्रच नोंदवायला हवेत, असे योगऋषि रामदेवबाबा म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, कम्युनिस्टांनी त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जगभरात हत्या केल्या आहेत. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी जगभरात ३० कोटीपेक्षा अधिक हत्या करण्यात आल्या आहेत. मुघलांनीही हत्या केल्या; मात्र हिंदू पहिल्यापासून सहिष्णु आहेत.


Multi Language |Offline reading | PDF