बिलिव्हर्स पंथियांच्या बसची दुचाकीस्वाराला धडक; मात्र बसमधील बिलिव्हर्स पंथीय साहाय्य न करता पसार !

बिलिव्हर्स पंथियांची बेगडी मानवता उघड !

पणजी, ५ मे (वार्ता.) – शिवोली येथील फाईव्ह पिलार चर्च या बिलिव्हर्स पंथीयांच्या बसने नुकतीच एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातानंतर दुखापत झालेल्या दुचाकीस्वाराच्या साहाय्याला न जाता वाहनात बसून रहाणार्‍या बिलिव्हर्स पंथियांची बेगडी मानवता उघड झाली आहे. गोवा रिपोर्ट कार्ड या सामाजिक प्रसारमाध्यम संस्थेने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या वृत्तात म्हटले आहे की, ४ मे या दिवशी ही दुर्घटना घडली. या वेळी शिवोली येथील फाईव्ह पिलार चर्च येथे जाणार्‍या फाईव्ह पिलार चर्चच्याच बसचालकाने वाहन वेगाने हाकतांना अन्य एका वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्‍या दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या हाताला दुखापत झाली; मात्र दुचाकीस्वाराने शिरस्राण परिधान केल्याने या वेळी मोठा अनर्थ टळला. ही घटना घडल्यानंतर बसमध्ये बसलेल्या बिलिव्हर्स पंथियांतील एकही सदस्य किंवा बसचालक यांनी बसमधून खाली उतरून अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला साहाय्य केले नाही, तर याउलट आमच्या देवाने दुचाकीस्वाराला वाचवले, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. (दुचाकीस्वाराला ठोकरणाराही बिलिव्हर्स पंथियांचा देवच होता का ? असाही यातून प्रश्‍न पडतो. त्याचे उत्तर बिलिव्हर्स पंथियांकडे आहे का ? – संपादक) बिलिव्हर्स पंथीय खोट्या देवाला मानतात आणि मानवतेला मानत नाहीत, अशा प्रतिक्रिया अपघातस्थळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now