‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संशोधनकार्यात सहभागी होऊन अध्यात्मजगताची ओळख करून घ्या !

अखिल मानवजातीपर्यंत संशोधनकार्य पोचवण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !

१ – २ वर्षांत महाभीषण आपत्काळाला आरंभ होणार आहे. त्यापूर्वीच अनेक विषयांवर संशोधन करून हे ज्ञानभांडार अखिल मानवजातीपर्यंत पोचवायचे आहे. त्यामुळे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात विविध सेवांसाठी मनुष्यबळाची तातडीने आवश्यकता आहे. आपण आपली आवड आणि कौशल्य यांनुसार संशोधनसेवा शिकू शकता.

१. संशोधन कार्याची व्याप्ती 

यामध्ये हिंदु धर्मातील आचार, यज्ञ, अनुष्ठान, मंत्रपठण आदी धार्मिक कृती; देश-विदेशांतील तीर्थक्षेत्रे, संतांची समाधीस्थाने आणि ऐतिहासिक स्थळे, तसेच वाईट शक्ती आणि त्यांच्या त्रासांवरील उपाय; दैवी शक्ती अन् वाईट शक्ती यांचा दृश्य परिणाम दर्शवणारे संशोधन आणि सात्त्विक संगीत, नृत्य, वाद्यवादन आदी कलांच्या संदर्भात केले जाणारे विविधांगी संशोधन अंतर्भूत आहे.

२. संशोधन कार्याचे वैशिष्ट्य

या संशोधनाला पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे सूक्ष्म-परीक्षणाची जोड देऊन विश्‍लेषण करण्यात येत आहे. त्यामुळे बुद्धीजीवी समाजावर अध्यात्माचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होते.

संशोधनाशी संबंधित सेवा करणार्‍यांना विविध सेवांतून अध्यात्मजगताची अभिनव ओळख होईल, तसेच ज्ञानाचा एक निराळा आनंदही अनुभवायला मिळेल. हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यातील या महत्त्वाच्या टप्प्याचे साक्षीदार होण्याची संधी दवडू नका !


Multi Language |Offline reading | PDF