वैज्ञानिकांना आवाहन – बुद्धीअगम्य घटनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी सनातनच्या आश्रमाला भेट द्या !

‘दत्तमालामंत्र’ पठणामुळे आपोआप उगवलेली औदुंबराची रोपे

जवळ जवळ सर्वच विषयांतील अंतिम सत्य आपल्या ऋषिमुनींनी लिहून ठेवले आहे. असे असले तरी विश्‍वाची रहस्ये उलगडणार्‍या वैज्ञानिकांत गॅलिलिओ, न्यूटन अशा अनेक पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांची नावे असतात; पण भारतीयांची नावे अभावानेच आढळतात. हे चित्र आपल्याला पालटायचे आहे. मानवजातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा अनेक अद्वितीय बुद्धीअगम्य घटना गोवा येथील सनातन आश्रमात घडत आहेत. ‘या अद्वितीय घटना पर्यायाने विश्‍वाची रहस्ये वैज्ञानिकदृष्ट्या उलगडण्याचे श्रेय भारतीय संशोधकांनाच मिळावे’, असे आम्हाला मनोमन वाटते. त्यासाठी सर्व वैज्ञानिकांना आणि अभ्यासकांना आम्ही विनंती करतो की, सनातनच्या आश्रमाला अवश्य भेट द्यावी. तेथील बुद्धीअगम्य घटनांचा अभ्यास करावा. आपले ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग अखिल मानवजातीला करून देणार्‍या या संधीचा अवश्य लाभ घ्यावा !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now