परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे संशोधनकार्य विशेष

विश्‍वकल्याणार्थ सनातन हिंदु धर्मातील वैज्ञानिकता सिद्ध करणारी परात्पर गुरूंची अमूल्य देणगी !

अखिल मानवजातीला ‘आनंदप्राप्ती’ हे मूलभूत ध्येय साध्य करता यावे, यासाठी अध्यात्म आणि हिंदु धर्म यांची महती आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत सांगण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक संशोधनकार्य आरंभले ! अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र असूनही आधुनिक वैज्ञानिक उपकरणे आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या साहाय्याने अध्यात्मातील ‘का’ आणि ‘कसे’ यांची शास्त्रशुद्ध कारणमीमांसा सांगणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय संत आहेत !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सूक्ष्मातून मिळत असलेल्या उत्तरांच्या माध्यमातून त्यांच्या संशोधनकार्याचा प्रारंभ झाला. आता विविध वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्यानेही संशोधन चालू आहे. या परिपूर्ण आध्यात्मिक संशोधनाचे निष्कर्ष विविध माध्यमांतून आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने आज जगभरातील सहस्रो व्यक्ती साधना अंगीकारून त्याचा लाभ अनुभवत आहेत. या अद्भुत कार्याचा धावता मागोवा…

सूक्ष्म ज्ञानाद्वारे बुद्धीअगम्य घटनांची उकल

बुद्धीअगम्य घटनांची सूक्ष्मातून मिळणार्‍या ज्ञानाद्वारे उकल करणार्‍या सनातनच्या पहिल्या ज्ञान प्राप्तकर्त्या साधिका सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ! त्यांना काचेच्या बरणीतील कांस्यवाटीत आपोआप बनलेल्या अत्तराचे संशोधन करण्याविषयी मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले ! (वर्ष २०१०)

बुद्धीअगम्य घटनांचे भौतिक परीक्षण

बुद्धीअगम्य घटनांच्या सूक्ष्म-परीक्षणासह भौतिक प्रयोगशाळांमध्ये पृथक्करण करून सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही स्तरांवर अभ्यास करायला परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवले. कु. प्रियांका लोटलीकर यांना छायचित्रातील साधिकेच्या कपाळावर आलेल्या दैवी कणांच्या संशोधनाविषयी दिशादर्शन करतांना परात्पर गुरु डॉक्टर (वर्ष २०१५)

उपकरणांद्वारे केलेल्या संशोधनातून अध्यात्मप्रसार !

अध्यात्मशास्त्र जगाला आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत समजावून सांगण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर वैज्ञानिक उपकरणांद्वारेही संशोधन करत आहेत. याअंतर्गत यज्ञाचा संकल्प केल्यानंतर त्यांच्या उजव्या तळहाताच्या त्वचेवरील तापमानाचे ‘थर्मल इमेजिंग कॅमेर्‍या’द्वारे परीक्षण करतांना श्री. शॉन क्लार्क (वर्ष २०१६)

आध्यात्मिक संशोधनाचे अभूतपूर्व कार्य करणारे द्रष्टे संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !


Multi Language |Offline reading | PDF