ख्रिस्त्यांना न्याय मिळाला नाही, तर ते कायदा हातात घेतील ! – श्रीलंकेतील चर्चच्या कार्डिनलची चेतावणी

श्रीलंकेतील अल्पसंख्यांक असणार्‍या ख्रिस्त्यांचे धर्मगुरु जिहादी आतंकवाद्यांनी प्रथमच ख्रिस्ती धर्मियांना लक्ष्य केल्यावर थेट अशा प्रकारची चेतावणी देतात, तर भारतात गेली ३ दशके हिंदूंवर जिहादी आतंकवादी आक्रमणे होत असतांनाही हिंदूंच्या धर्मगुरूंनी कधीही अशी चेतावणी दिलेली नाही. यावरून ‘हिंदू सहिष्णु आहेत’, हे पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?

कोलंबो (श्रीलंका) – जर सरकारच्या अन्वेषण यंत्रणांना बॉम्बस्फोटांचे गुन्हेगार सापडत नसतील आणि त्यांना न्यायालयात खेचण्यात सरकार अपयशी ठरले, तर ख्रिस्ती समाज कायदा हातात घेण्यास मागे-पुढे पहाणार नाही, अशी चेतावणी कोलंबोचे कार्डिनल मालकॉम रंजीथ यांनी दिली आहे. ‘मुख्य राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवावेत’, असे आवाहनही त्यांनी केेले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कार्डिनल रंजीथ पुढे म्हणाले की,

१. मला असे सांगायचे आहे की, सरकारने प्रभावी सुरक्षा कार्यक्रम आखला नाही, तर आम्ही लोकांना (ख्रिस्त्यांना) नियंत्रणात ठेवू शकणार नाही. आम्ही त्यांना कायमचे खोटे आश्‍वासन देऊन त्यांना शांत ठेवू शकत नाही. सरकारने लोकांना कायदा हातात घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी योग्य कार्यक्रम कार्यान्वित करावा.

२. सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलत नाही आणि शाळांच्या व्यवस्थापनाला शाळा बंद ठेवण्याचा आदेश देते.

३. बॉम्बस्फोटांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीत सेवानिवृत्त अधिकार्‍यांचा  समावेश करण्यात आला आहे. असे करून या घटनेचे दायित्व इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.


Multi Language |Offline reading | PDF