पाकिस्तानमध्ये मसूद अझहर याची संपत्ती जप्त करण्याचा आदेश

  • ‘आम्ही मसूद अझहर याच्यावर कारवाई करत आहोत’, हे जगाला दाखवण्यासाठी पाक असा आदेश देत आहे ! ज्या मसूद अझहर याला पाक सैनिकांचाच पाठिंबा आहे, तेथे त्याच्यावर कारवाई होऊ शकते का ?
  • भाजप सरकारने ‘पाक मसूद अझहर याच्या विरोधात कारवाई करेल’, अशा भ्रमात न रहाता भारतीय सैनिकांना पाकमध्ये घुसवून त्याला संपवण्याचा आदेश द्यावा, असेच भारतियांना वाटते !

इस्लामाबाद – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित केल्यानंतर पाकिस्तानने त्याची संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आहे. तसेच त्याला प्रवासबंदीही लागू करण्यासह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांची खरेदी अन् विक्री करण्यावरही बंदी घातली आहे.


Multi Language |Offline reading | PDF