मुसलमान तरुणाने हिंदु धर्म स्वीकारला, तर त्याच्याशी विवाह करणार ! – सूरत (गुजरात) येथील हिंदु तरुणीची प्रियकराला अट

मुसलमान तरुणाने हिंदु धर्म स्वीकारला, तरी तो मनाने किती प्रमाणात हिंदु झाला आहे, हे कसे कळणार ? आणि नंतर त्याने पुन्हा इस्लाम स्वीकारला, तर काय करणार ? त्यामुळे हिंदु तरुणींनी स्वधर्माचे पालन करावे !

सूरत (गुजरात) – मी मुसलमान तरुणाशी विवाह करण्यास सिद्ध आहे; मात्र  त्याला हिंदु धर्म स्वीकारावा लागेल. त्याने पुन्हा कधीही इस्लाम धर्म स्वीकारू नये. तसेच त्याला मांसाहार करणे सोडावे लागेल. तरुणाने मला मांसाहार करण्यास भाग पाडू नये, अशा अटी येथे एका १८ वर्षांच्या हिंदु तरुणीने तिचा प्रियकर असणार्‍या एका मुसलमान तरुणाशी विवाह करण्याची सिद्धता दर्शवतांना त्याला घातल्या आहेत. या हिंदु तरुणीने येथील कतारगाम पोलीस ठाण्यात प्रतिज्ञापत्र दिले आहे. यात वरील अटी लिहिल्या आहेत. जर या अटी त्याने मान्य केल्या नाहीत, तर ती या मुसलमान तरुणाशी विवाह करणार नाही, असेही तिने म्हटले आहे.

या तरुणीचे या मुसलमान तरुणावर प्रेम आहे. त्याच्या प्रेमात ती घर सोडून गेली होती. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तिला शोधले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला समजावले. ‘मुसलमान तरुणाशी विवाह केल्यावर मांसाहार करावा लागेल’, असे सांगितले. यानंतर तिने हे प्रतिज्ञापत्र सादर केले.


Multi Language |Offline reading | PDF