क्षमा मागण्यासाठी २२ पानांचे प्रतिज्ञापत्र का लागते ? – सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारले !

राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात सपशेल क्षमायाचना

नवी देहली – राफेल खरेदी प्रकरणावरील निकालावर फेरविचार करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्यावर ‘सर्वोच्च न्यायालयही ‘चौकीदारच चोर आहे’, असे म्हणत आहे’, अशा केलेल्या विधानावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २ वेळा न्यायालयात खेद व्यक्त केला होता; मात्र त्यांनी अखेर न्यायालयात क्षमायाचना केली.

या वेळी न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारतांना ‘क्षमा मागण्यासाठी तुम्हाला २२ पानी प्रतिज्ञापत्रांची आवश्यकता का भासते ?’, असा प्रश्‍न विचारला. गांधी यांच्या अधिवक्त्यांकडून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झाल्यावर न्यायालय म्हणाले की, ‘तुमच्या राजकीय भूमिकेत आम्हाला रस नाही. तुमची भूमिका तुमच्याकडेच राहू द्या.’


Multi Language |Offline reading | PDF