५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा (गोवा) येथील चि. लोविक विशाल प्रियोळकर (वय २ वर्षे ९ मास) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. लोविक विशाल प्रियोळकर हा एक आहे !

चि. लोविक प्रियोळकर

फोंडा (गोवा) येथील चि. लोविक विशाल प्रियोळकर याच्या आजीला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

१. सात्त्विकतेची आवड

चि. लोविक प्रतिदिन टिळा लावतो, सूर्याला नमस्कार करतो आणि तुळशीचे पान खातो. तो श्री महालक्ष्मीच्या किंवा दत्ताच्या देवळात गेल्यावर स्वतःहून तेथील पायर्‍यांना हात लावून नमस्कार करतो. तो घरातील श्री दुर्गादेवीच्या चित्राजवळ जातो आणि हात पुढे करून त्याच्या भाषेत दे दे, असे म्हणतो अन् तो हात स्वतःच्या छातीला लावतो.

२. आध्यात्मिक उपाय करणे

लोविक मोरपीस आणि दैनिक सनातन प्रभात यांनी स्वतःवरील त्रासदायक आवरण काढतो. कापूर आणि अत्तर यांचे उपाय करतो. उपाय झाल्यावर उपायांचे साहित्य जागेवर ठेवतो.

३. श्रीकृष्णाची ओढ

अ. लोविकला तेल लावतांना तो एखाद्या दिशेकडे पाहून मला म्हणतो, आजी, तो बघ श्रीकृष्ण. त्याला नमस्कार कर.

आ. तो तीतम, तीतम (तो श्रीकृष्णाला तीतम असे म्हणतो.), असे म्हणत आनंदाने नाचतो. कधी कधी एक पाय वाकवून नाचतो. तो मलाही श्रीकृष्ण म्हणायला सांगतो.

इ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी रामनाथी आश्रमात लावलेल्या सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनात लोविकला श्रीकृृष्णाचे पदक दिसले. त्याने आईला ते पदक घेण्यास सांगितले आणि लगेच गळ्यात घातले.

ई. मी एकदा लोविकला घेऊन रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा त्याने तेथील श्रीकृष्णाचे मोठे चित्र बघितले आणि तीन वेळा तीता (श्रीकृष्ण) अशी हाक मारली आणि श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार घातला.

उ. दूरदर्शनच्या साई वाहिनीवरील साईबाबांचे चित्र पाहिले की, तो कृष्ण आहे, असे म्हणून नमस्कार करतो.

४. देवपूजेची आवड

तो प्रतिदिन देवाला उदबत्तीने ओवाळतो आणि फुले वाहतो. तो घंटा आणि टाळही छान वाजवतो. त्याची पूजा झाली की, तो परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राची पापी घेतो आणि डोके टेकवून त्यांना अन् श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार करतो.

५. संत आणि साधक यांना नमस्कार करणे

एकदा आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा तेथे बसलेल्या पू. बाबा (सदानंद) नाईक यांना त्याने स्वतःहून नमस्कार केला, तसेच तो पू. पृथ्वीराज हजारेकाका आणि आश्रमातील साधक यांना पाहिल्यावर लगेच नमस्कार करतो.

६. दैनिक सनातन प्रभातमधील संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र अचूक ओळखणे

त्याने रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात असलेले संत भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) मोठे छायाचित्र पाहिले आणि मला म्हणाला, आजी, हे कोण आहेत ? मी त्याला सांगितले, हे प.पू. बाबा आहेत. लगेच त्याने बाबा, बाबा, बाबा, अशी तीन वेळा हाक मारली. पूर्वी मी दैनिक वाचत असतांना तो मला परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र दाखवायचा. आता तो बाबा, बाबा, म्हणत दैनिकातील संत भक्तराज महाराज यांचे छायाचित्र दाखवून त्याची आणि परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राची पापी घेऊन त्यांना नमस्कार करतो.

७. चुकांविषयी सतर्कता

चि. लोविकला त्याची चूक सांगितल्यावर तोे लगेच कान पकडून उठाबशा काढतो. तो मलाही माझी चूक लगेच सांगतो, उदा. मी नळ पूर्ण बंद केला नाही, तर तो बोटाने खुणावून आजी, नळ बंद कर, असे सांगतो.

८. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

२५.७.२०१८ या दिवशी आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्याला एका संतांची खोली ठाऊक नसूनही आम्ही त्या संतांच्या खोलीसमोरून जात असतांना त्याने नमस्कार केला. तेव्हा मला आश्‍चर्य वाटले. एकदा त्याने मला आजी, गॅस बंद कर, असे सांगितले, तरीही मी तो लगेच बंद केला नाही. नंतर गॅसवर ठेवलेला कुकर उघडून पाहिल्यावर आतील पदार्थ करपले होते.

९. स्वभावदोष : राग येणे.

हे परात्पर गुरुदेवा, तुम्ही आम्हाला हे बाळ दिलेत, यासाठी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

– सौ. रेखा चंद्रकांत नाईक (चि. लोविकची आजी), तळावली, फोंडा, गोवा. (२२.९.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF