१ सहस्र आणि ५०० रुपयांच्या अनुमाने १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त !

ईश्‍वरपूर, ३ मे – येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरात १ सहस्र रुपये मूल्य असलेल्या आणि ५०० रुपयांच्या ९९ लक्ष ९७ सहस्र ५०० रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी दत्तासिंग हजारे, रमेश पाटील, दीपक बाकले, तसेच एक अल्पवयीन मुलगा यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. यातील हजारे आणि बाकले यांना ७ मेअखेर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चलनातून खराब झालेल्या नोटा घेऊन संशयित ईश्‍वरपूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून या सर्वांना कह्यात घेतले. ‘सर्व नोटा पालटून घेण्यासाठी आणल्या होत्या’, असे संशयितांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF