भारत आणि फ्रान्स नौदलांच्या संयुक्त युद्धसरावाला प्रारंभ

भारतीय सैन्य केवळ सरावापर्यंत सिमित न ठेवता शत्रूला भारताकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, अशी कृती करण्याची सैन्याला मोकळीक देणे आवश्यक आहे. असे राज्यकर्ते गेल्या ७१ वर्षांत मिळाले नाहीत. कणखर राज्यकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही  !

मुंबई – भारत आणि फ्रान्स यांच्या नौदलांचा संयुक्त युद्धसराव १ मेपासून गोव्याजवळील समुद्रात चालू झाला आहे. फ्रान्स नौदलाच्या अणू पाणबुडीचा आणि भारतीय नौदलाच्या शिशुमार वर्गातील पाणबुडीचा समावेश यामध्ये आहे. गोव्यात समुद्रकिनारी आणि समुद्रात अशा दोन ठिकाणी हा युद्धसराव होत आहे. भारतीय नौदलातील आयएन्एस् विक्रमादित्य, आयएन्एस् मुंबई, आयएन्एस् टर्कश आणि आयएन्एस् दीपक या युद्धनौकांनी यामध्ये भाग घेतला आहे. हा युद्धसराव १० मेपर्यंत चालू असणार आहे. वरुण १९.१ या नावाने होणार्‍या या सरावात भारत आणि फ्रान्सच्या विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, फ्रीगेट, तेज-फ्रीगेट प्रकारातील युद्धनौका यांचा समावेश आहे.

वरुण १९.२ हा या सरावाचा दुसरा भाग मेच्या अखेरीस जिबौती येथे होणार आहे.

मुंबईनजीकच्या समुद्रातील ‘व्यावसायिक उपयोगिता सुरक्षा क्षेत्रात प्रस्थान’ हा सुरक्षा सराव ३० एप्रिलला घेण्यात आला. समुद्रातील व्यावसायिक उपयोगिता सुरक्षा क्षेत्रात काही आकस्मिक घटना घडल्यास त्याला प्रतिसाद देण्याची प्रक्रिया तपासण्यासाठी हा सराव करण्यात आला.

भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, तटरक्षक दल, ओएन्जीसी, पोर्ट ट्रस्ट, सीमाशुल्क विभाग, राज्य मत्स्य व्यवसाय विभाग, सागरी पोलीस यांचा सहभाग या सुरक्षा सरावात करण्यात आला होता.


Multi Language |Offline reading | PDF