‘सैनिकांच्या सुरक्षेचे दायित्व कोणाचे ?’ – रेणुका शहाणे यांचा संतप्त प्रश्‍न

हा प्रश्‍न रेणुका शहाणे यांनी पूर्वीच्या सरकारांनाही कधी का केला नाही ?

मुंबई – ‘सुरक्षा दलातील सैनिकांच्या प्राणांचे काहीच मोल नाही का ? त्यांच्या सुरक्षेचे दायित्व कोणाचे ?’ असा प्रश्‍न करत अभिनेत्री सौ. रेणुका शहाणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध नोंदवला आहे. रेणुका शहाणे यांनी सैनिकांवरील या आक्रमणाचा तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, ‘‘ज्या सुरक्षाकर्मींचे प्राण गेले, त्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकीकडे आतंकवाद, तर दुसरीकडे नक्षलवाद. आपल्या सुरक्षाकर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का ? त्यांच्या सुरक्षिततेचे दायित्व कोणाचे ?’’


Multi Language |Offline reading | PDF