‘सुवर्ण मंदिर’ नव्हे; तर ‘श्री अमृतसर’ म्हणा ! – अकाल तख्तचे आवाहन

अमृतसर – शिखांची सर्वोच्च धार्मिक संस्था असलेल्या अकाल तख्तने आवाहन केले आहे की, येथील त्यांच्या प्रमुख धर्मस्थळाला ‘सुवर्ण मंदिर’, ‘गोल्डन टेंपल’, असे संबोधू नये, त्याऐवजी ‘सचखंड श्री हरमंदिर साहब’, ‘श्री दरबार साहिब’ किंवा ‘श्री अमृतसर’ या नावाने संबोधावे.

राष्ट्रीय महामार्ग मंडळाने एका फलकावर ‘सुवर्ण मंदिर’ असे लिहिल्याने अकाल तख्तने त्यावर आक्षेप घेत हे आवाहन केले आहे. ‘गोल्डन टेंपल’ या नावाशी धार्मिक भावना जुळत नसल्याने तख्तचे प्रमुख ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी हे आवाहन केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF