हावडा (बंगाल) येथे आसाम रायफल्सच्या तळावरील गोळीबारात एक अधिकारी ठार, तर २ सैनिक घायाळ

गोळीबारामागील कारण अजूनही अस्पष्ट !

हावडा (बंगाल) – येथील बगनानमध्ये आसाम रायफल्सच्या एका तळावर लक्ष्मीकांत बर्मन नावाच्या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात भोलानाथ दास हा अधिकारी ठार झाला, तर रंतुमोनी आणि अनिल राजबंग्शी हे २ सैनिक घायाळ झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात सुरक्षेसाठी या सैनिकांना येथे पाठवण्यात आले आहे. या गोळीबारामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.


Multi Language |Offline reading | PDF