‘अक्षय्य तृतीया’च्या निमित्ताने मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत दृकश्राव्य (audio-visual) धर्मसत्संग उपलब्ध

सनातनचे जिल्हासेवक आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक यांना सूचना

‘हिंदु धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे ‘अक्षय्य तृतीया’ .‘अक्षय्य तृतीया’ ७ मे २०१९ ला आहे. या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने ‘अक्षय्य तृतीया’चे महत्त्व सांगणारा अंदाजे २० मिनिटे कालावधीचा एक दृकश्राव्य (audio-visual) धर्मसत्संग मराठी आणि हिंदी भाषेत, तसेच दोन दृकश्राव्य धर्मसत्संग कन्नड भाषेत सिद्ध करण्यात येत आहेत. हे सत्संग सिद्ध झाल्यावर जिल्ह्यांना पाठवण्यात येतील. धर्मशिक्षणासाठी या सत्संगांचे अधिकाधिक प्रसारण करण्यासाठी जिल्ह्यांनी नियोजन करावे. सत्संगांच्या प्रसारणानंतर त्याचा आढावाही पुढील संगणकीय पत्त्यावर पाठवावा. सत्संग मिळण्यात काही अडचणी असल्यास सौ. वृंदा मराठे यांच्याशी [email protected]  या इमेल पत्त्यावर संपर्क करावा अन्य कुठेही करू नये.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now