सनबर्न क्लासिकने गोवा शासनाचा माल आणि सेवा कर बुडवला

३ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा कर बुडवूनही यंदा सनबर्न क्लासिकला कार्यक्रम घेण्यास अनुमती देणार्‍या संबंधितांकडून हा कर वसूल करावा, तरच असले मनमानी कारभार थांबतील ! गोव्यातील भाजप शासनाला हे लज्जास्पद !

पणजी, १ मे (वार्ता.) – सनबर्नच्या आयोजकांनी २३ आणि २४ फेब्रुवारी या कालावधीत वागातोर येथील समुद्रकिनार्‍यावर सनबर्न क्लासिक या इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हलचे आयोजन केले होते. सनबर्न क्लासिकच्या आयोजकांनी २० मार्चपर्यंत माल आणि सेवा कर (जीएसटी) भरणे अपेक्षित होते; मात्र आतापर्यंत तो भरलेला नाही. कमर्शियल टॅक्स विभाग यासाठी सनबर्न क्लासिकच्या आयोजकांना नोटीस पाठवण्याच्या सिद्धतेत आहे. (३ वर्षांपूर्वीचा कर न भरणारे आयोजक या नोटिसीला भीक घालणार आहेत का ? कागदी घोडे नाचवून असले लोक बधत नसतात. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे ! सरकार यातून काही शिकेल तो सुदिन ! – संपादक)

कमर्शियल टॅक्स विभागाचे आयुक्त दीपक बांदेकर म्हणाले, सनबर्न क्लासिकच्या आयोजकांनी समयमर्यादा उलटूनही अजूनही माल आणि सेवा कर भरलेला नाही. आपला विभाग कर थकबाकीविषयी आढावा घेत आहे आणि लवकरच आयोजकांना याविषयी नोटीस पाठवण्यात येणार आहे.

सनबर्नचे मुंबईस्थित आयोजक पर्सेप्ट लाईव्ह यांनी गोवास्थित नाईटलाईव्ह आणि प्रमोशन कंपनी क्लासिक यांच्या साहाय्याने यंदा गोव्यात सनबर्न क्लासिकचे आयोजन केले होते. सनबर्न क्लासिकच्या संबंधित विक्रेत्याने गोवा शासनाच्या जीएसटीकडे नोंदणी केलेली आहे आणि यासाठी गोवा शासनाला सनबर्न क्लासिकची थकबाकी वसूल करण्यास सोयीचे होणार आहे. संबंधित विक्रेत्याने केंद्रशासनाच्या जीएसटीकडे नोंदी केली असती, तर ही थकबाकी वसूल करण्यास गोवा शासनाला केंद्राकडे मागणी करावी लागली असती. विशेष म्हणजे सनबर्नच्या आयोजकांनी यापूर्वी गोवा शासनाचा कर आणि पोलीस नेमण्यासंबंधी आकारण्यात येणारे शुल्क मिळून सुमारे कोट्यवधी रुपये बुडवले आहेत. विरोधानंतर मागील ३ वर्षे सनबर्नचे गोव्यात आयोजन झाले नव्हते; मात्र यंदा ३ वर्षांच्या अंतरानंतर गोव्यात सनबर्नचे आयोजन झाले. कर बुडवण्याची पार्श्‍वभूमी असलेल्या सनबर्नने यंदाही पुन्हा शासनाचा माल आणि सेवा कर बुडवला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now