मूलतःच सात्त्विक आणि प्रेमळ असलेली ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली इंदूर, मध्यप्रदेश येथील कु. हर्षिता बेनीसिंह रघुवंशी (वय १६ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. हर्षिता बेनीसिंह रघुवंशी ही एक आहे !

इंदूर येथे प्रसारसेवेत असतांना मी पुष्कळ वेळा कु. हर्षिता रघुवंशी यांच्या घरी रहात असेे. तेव्हा ती केवळ ३ – ४ वर्षांची होती. तेव्हा मला ती पुष्कळ सात्त्विक आहे आणि ती उच्च स्वर्गलोकातून आली असावी, असे वाटत होते. एवढ्या बालवयातही ती मनापासून नामजप करायची आणि विशेष म्हणजे ती आज्ञाधारकही होती. घरात कोणी साधक आले, तर तिला पुष्कळ आनंद व्हायचा. ती सगळ्यांवर पुष्कळ प्रेम करायची. नंतर ११ वर्षांनी ती मला रामनाथी आश्रमात भेटली. तेव्हा मला हर्षितामध्ये साधकत्वाचे पुष्कळ गुण दिसून आले आणि परात्पर गुरु डॉक्टर ईश्‍वरी राज्यासाठी दैवी पिढीची निर्मिती करत असल्यामुळे त्यांंच्या श्री चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

(कु. हर्षिता बेनीसिंह रघुवंशी हिची आध्यात्मिक पातळी वर्ष २०१२ मध्ये ५१ टक्के होती. – संकलक)

कु. हर्षिता बेनीसिंह रघुवंशी

१. हुशार

अभ्यासासमवेत हर्षिताने लहान वयातच ताईक्वांदोे या मार्शल आटर्सच्या प्रकारात ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. ती लिखाणही चांगल्या प्रकारे करते.

२. निर्मळ

कु. हर्षिताचे मन निर्मळ असल्यामुळे ती आपल्या मनातील गोष्टी सर्वांना मोकळेपणाने सांगते.

३. इतरांचा विचार करणे

अ. कु. हर्षिता मला भेटण्यासाठी रामनाथी आश्रमातील आमच्या खोलीत आली. तेव्हा मी तिला हातात घालण्यासाठी एक बांगडी (ब्रेसलेट) आणि दोन चॉकलेट दिली. तिने तिच्या खोलीत गेल्यावर ती दोन्ही चॉकलेट आपल्यासमवेत असलेल्या साधकांना दिली आणि मला म्हणाली, मला बांगडी (ब्रेसलेट) मिळाली होती; म्हणून मी चॉकलेट त्यांना दिली.

आ. एके दिवशी महाप्रसादाच्या वेळी भात संपल्यावर सर्वांना ५ मिनिटे थांबण्यास सांगितले होते. भात येताच ती लगेच उठली आणि आपल्यासमवेत बसलेल्या साधकांना म्हणाली, तुम्ही बसा. मी भात आणते. तिने आधी सर्वांच्या ताटात भात वाढला आणि नंतर स्वतःसाठी घेतला.

४. मिळून मिसळून रहाणे

आश्रमात आल्यानंतर ती लगेच सर्वांमध्ये मिसळून गेली आणि तिने आश्रमजीवन सहजतेने स्वीकारले.

५. साधनेची तळमळ

कु. हर्षिता विद्यालयाच्या सुटीत आश्रमात आली आहे. दोन दिवसांतच ती पूर्ण समर्पणभावाने व्यष्टी साधना आणि सेवा करू लागली. येथे आल्यावर काही दिवसांतच तिने निर्णय घेतला, साधना करणे, हेच स्वतःच्या जीवनाचे ध्येय आहे.

६. स्वीकारण्याची वृत्ती

आश्रमात एक विवाह समारंभ होता. आश्रमातील विवाह समारंभ पहायला मिळणार; म्हणून हर्षिता पुष्कळ उत्साही होती; पण तिला त्या विवाह समारंभाला येण्याची सूचना मिळाली नाही; म्हणून तिला प्रथम वाईट वाटले. त्यासाठी तिने तिच्यासमवेत असलेल्या साधिकेशी वादही घातला. थोड्या वेळाने तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि तिने लगेच क्षमा मागितली. तिने सांगितले, मला त्या प्रसंगात वडिलांनी सांगितलेला एक दृष्टीकोन आठवला, ईश्‍वर जेव्हा एखादी छोटी गोष्ट पूर्ण करत नाही, तेव्हा तो पुढे काहीतरी पुष्कळ चांगले देणार असतो. त्यानंतर मला काही वाटले नाही.

– कु. संगीता मेनराय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.५.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF