अमेरिकेत शीख कुटुंबातील ४ जणांची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेतील असुरक्षित भारतीय !

न्यूयॉर्क – अमेरिकेतील ओहियो प्रांतातील वेस्ट चेस्टर भागात २८ एप्रिलच्या रात्री एका शीख कुटुंबातील ४ जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृतांमध्ये ३ महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे. या हत्याकांडामागचे कारण अद्याप समजले नसून पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. ‘वर्णद्वेषावरून या हत्या करण्यात आल्या होत्या का?’, याचाही शोध पोलीस घेत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF