श्रीलंकेनंतर भारत आणि बांग्लादेश येथे आक्रमण करण्याची इस्लामिक स्टेटची शक्यता

नवी देहली – इस्लामिक स्टेटच्या (‘आयएस्’च्या) एका गटाने भारत आणि बांगलादेश येथे आक्रमण करण्याची धमकी दिली आहे. यााठी अबु महंमद अल बंगाली या आतंकवाद्याला दायित्व देण्यात आले आहे. आयएसने बंगाली, इंग्रजी आणि हिंदी भाषेत भित्तीपत्रक प्रसारित करून ही धमकी दिली आहे. ‘बांगलादेश आणि भारत येथील आमचे प्रमुख गप्प बसले आहेत, असे समजू नका. आम्ही शांत बसणर्‍यांमधील नाहीत. आमचा सूडाग्नी कधीही शांत होणार नाही. आम्ही योग्य तो सूड घेऊ’, असे यात म्हटले आहे. या धमकीनंतर गुप्तचर आणि अन्वेषण यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

२९ एप्रिल या दिवशी ढाका येथील गुलिस्तान चित्रपटागृहाबाहेर आयएसकडून स्फोट घडवण्यात आला होता. यात कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. यानंतर दुसर्‍या दिवशी आयएसने ही धमकी दिली आहे. गेल्या आठवड्यातही आयएसने एक भित्तीपत्रक प्रसारित करून ‘लवकरच येत आहोत’ असे म्हटले होते.


Multi Language |Offline reading | PDF