पाकिस्तानमध्ये पाय पसरून बसलेल्या तरुणीच्या चित्रावरून गदारोळ

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये रुमिसा लखानी आणि रशीदा शब्बीर हुसैन या दोघी तरुणींनी आंतरराष्ट्रीय महिला दिवसासाठी बनवलेल्या एका चित्रावरून पाकिस्तानमध्ये गदारोळ निर्माण झाला आहे. या चित्रामध्ये एक तरूण मुलगी स्वतःचे पाय फाकवून बसली आहे, तिच्या डोळ्यांवर गॉगल आहे आणि तिच्या चेहर्‍यावर बेफिकीर हसू आहे. तसेच त्याला ‘येथे मी बसले आहे ते योग्यच आहे’, असे शीर्षक देण्यात आले आहे.

याविषयी रुमिसा म्हणाली की, आमच्याकडून शालीनतेची अपेक्षा केली जाते, आम्ही अंग चोरून बसावे अशी अपेक्षा केली जाते; आम्ही सतत या काळजीत असतो की, आमच्या शरीराचा आकार तर कोणाला दिसत नाही ना; पुरुष स्वतःला हवं तसं बसू शकतात, त्यांच्यावर कोणाची बंधन नसतात.


Multi Language |Offline reading | PDF