सरन्यायाधिशांवरील आरोपांना प्रसिद्धी देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली

हिंदूंच्या संतांवरील कथित लैंगिक शोषणांच्या वृत्तांना कोणी प्रसिद्धी देऊ नये, यासाठी कोणी कधीच याचिका प्रविष्ट केली नाही, हे लक्षात घ्या !

नवी देहली – सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांना प्रसिद्धी देण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखावे, अशी मागणी केलेली याचिका विचारात घ्यायला देहली उच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी कर्मचारी महिलेने गोगोई यांच्यावर हे आरोप केलेले आहेत. ‘अँटी करप्शन कौन्सिल ऑफ इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेने ही याचिका केली होती. या आरोपांना प्रसिद्धी मिळत असल्यामुळे त्याचा थेट फटका भारतीय न्यायपालिकेला बसत आहे, असे या संस्थेने म्हटले होते. त्यावर न्यायालयाने म्हटले की, सर्वोच्च न्यायालयात आधीच हे प्रकरण असल्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. या मागणीसाठी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जा.


Multi Language |Offline reading | PDF