महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून १ ते ५ मे या कालावधीत शिवोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

यंदाचे ३३ वे वर्ष

सांगली, ३० एप्रिल (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने साजरा होणारा गावभाग येथील विसावा मंडळाचा शिवोत्सव १ ते ५ मे या कालावधीत होत आहे. यंदाचे हे ३३ वे वर्ष असून १ मे या दिवशी सकाळी ६.३० वाजता सनई, चौघडा, स्तोत्रपठण, शिवप्रभूंची प्रार्थना आणि आरती यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. कार्यक्रमासाठी पू. चंद्रशेखर केळकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय चव्हाण यांनी दिली.

श्री. संजय चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘१ मे या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘राजा श्री शिवछत्रपती’, या विषयावर सुप्रसिद्ध अभिनेते श्री. राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांचे वंशज श्री. मनोज पिंगळे हे अध्यक्षस्थानी असतील. या वेळी विविध मान्यवरांचा सत्कार होईल. २ मे या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘गदिमा आणि गीत रामायण’, या विषयावर श्री. देवदत्त राजोपाध्ये यांचे व्याख्यान होईल. ३ मे या दिवशी सायंकाळी गदिमा, बाबूजी, पु.ल. देशपांडे, स्नेहल भाटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम होईल. ४ मे या दिवशी सायंकाळी ७ वाजता ‘स्वर तरुणाईचे’ हा कार्यक्रम होईल. तरी याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ घ्यावा.’’


Multi Language |Offline reading | PDF