इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बकर अल बगदादी जिवंत

श्रीलंकेतील स्फोटांचे दायित्व स्वीकारले

जोपर्यंत जिहादी आतंकवादी संघटना आणि त्यांचे प्रमुख यांना नष्ट केले जात नाही, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होत नाही, हेच यातून लक्षात येते !

नवी देहली – इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बकर अल बगदादी जिवंत असल्याचे एका व्हिडिओद्वारे समोर आले आहे. बगदादीने ५ वर्षांनंतर व्हिडिओ प्रसारित करून तो जिवंत असल्याचा पुरावा दिला आहे. यात त्याने श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचे दायित्वही स्वीकारले आहे. हा व्हिडिओ १८ मिनिटांचा असून बगदादी यात अरबी भाषेत बोलत आहे. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेने सिरीयामधील एका स्फोटामध्ये बगदादीला ठार केल्याचा दावा केला होता.

१. या व्हिडिओमध्ये बगदादी काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. त्याच्या मागे अत्याधुनिक शस्त्र दिसत आहे. यात तो ३ जणांशी बोलत असून त्या तिघांचे चेहरे दाखवण्यात आलेले नाहीत.

२. या व्हिडिओमध्ये बगदादी म्हणतो, ‘‘बागूज(सिरीया)मधील युद्ध संपले आहे.’’ बागूज येथे इस्लामिक स्टेट आणि सैन्य यांच्यात चालू असलेले युद्ध गेल्या मासामाध्ये संपले होते.

३. व्हिडिओच्या शेवटी बगदादीने म्हटले आहे की, बागूजमधील रक्तरंजित संघर्षाचा सूड श्रीलंकेतील तुमच्या बांधवांनी घेतला आहे. आमचा लढा चालूच रहाणार आणि आम्ही सूड घेणारच.

४. यापूर्वी बगदादी मोसूलमधील एका मशिदीत भाषण करतांनाचा व्हिडिओ वर्ष २०१४ मध्ये प्रसारित करण्यात आला होता.


Multi Language |Offline reading | PDF