आसनसोल (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची तोडफोड

लोकसभा निवडणुकीच्या ४ थ्या टप्प्याचे मतदान

  • बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची हुकूमशाही चालू आहे; मात्र केंद्रातील भाजप सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !
  • तृणमूल काँग्रेसच्या हुकूमशाहीच्या विरोधात देशातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि अहिंसावादी राजकीय पक्ष, संघटना आदी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

कोलकाता – बंगालच्या आसनसोल मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या चारचाकी गाडीची तोडफोड केली. सकाळी आसनसोलच्या पांडाबेश्‍वर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या ४ थ्या टप्प्यातील मतदान चालू असतांना इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रामध्ये फेरफार झाल्याचे वृत्त पसरले. यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी मतदानकेंद्राच्या बाहेर घोषणाबाजी केली. या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. (गुंडांप्रमाणे मारामारी करणार्‍या कार्यकर्त्यांचा भरणा असलेले राजकीय पक्ष ! असे पक्ष लोकशाही निरर्थक बनवतात ! – संपादक) यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर लाठीमार करण्याचा प्रयत्न केला. (पोलिसांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करणारे तृणमूल काँग्रेसचे उद्दाम कार्यकर्ते ! बंगालमध्ये पोलीस तृणमूल काँग्रेस सरकारच्या ताटाखालचे मांजर झाल्यामुळे त्यांच्यावर ही स्थिती ओढवली आहे ! – संपादक) या वेळी बाबुल सुप्रियो तेथे पोेचल्यावर त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. बंगालच्या शांतीपूर येथे एका मतदाराच्या घराजवळ देशी बॉम्ब हस्तगत करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF