महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आयुर्वेद शाखेच्या वतीने नियोजित औषधी वनस्पतींच्या लागवडीच्या संदर्भातील सेवांत सहभागी होण्याची सुसंधी !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या आयुर्वेद शाखेच्या वतीने संभाव्य भीषण संकटकाळाची पूर्वसिद्धता म्हणून ठिकठिकाणी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. या सेवेच्या अंतर्गत ‘औषधी वनस्पती ओळखणे, लागवड कशी करावी ?’, याविषयी मार्गदर्शन करणे, शास्त्रीय पद्धतीने लागवड करवून घेणे, तसेच या सेवांमधील तांत्रिक अडचणी सोडवणे यांसाठी साहाय्य हवे आहे. यासाठी वनस्पतीशास्त्र (बॉटनी), शेती (अ‍ॅग्रिकल्चर), तसेच आयुर्वेद या शास्त्रांतील तज्ञ, औषधी वनस्पतींचे ज्ञान असलेले जाणकार यांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी माहिती देणारे ग्रंथ किंवा लिखाण उपलब्ध असल्यास तेही हवे आहे.

जे वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि साधक पूर्णवेळ अथवा घरी राहून ही सेवा करू शकतात किंवा लागवडीच्या संदर्भातील ग्रंथ किंवा लिखाण देऊ इच्छितात, त्यांनी स्थानिक साधकांच्या माध्यमातून जिल्हासेवकांना कळवावे. जिल्हासेवकांनी श्री. विष्णु जाधव यांना ८२०८५१४७९१ या संपर्क क्रमाकांवर अथवा [email protected] या संगणकीय पत्त्यावर ही माहिती कळवावी.

(टपालासाठी पत्ता : श्री. विष्णु जाधव, ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.’)


Multi Language |Offline reading | PDF