बापसोरा, बेतुल येथे स्थानिक फादरच्या चिथावणीवरून तुळशीवृंदावन तोडल्याची हिंदूंची तक्रार

हिंदू आणि ख्रिस्ती यांच्यात तणाव

मडगाव – बापसोरा, बेतुल येथील वेताळ देवस्थानच्या प्रांगणातील तुळशीवृंदावन २७ एप्रिलच्या मध्यरात्री दोन हेल्मेटधारी व्यक्तींनी तोंडले. यावरून वेताळ देवस्थानच्या भक्तांनी गोवा पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस या ठिकाणी येऊन तुळशीवृंदावनाचा उर्वरीत भाग घेऊन गेल्यामुळे स्थानिक हिंदू आणखी संतप्त झाले. त्यामुळे येथे सध्या तणाव वाढला आहे.

येथील स्थानिक ख्रिस्ती धर्मगुरु (फादर) त्यांची येथील चॅपलच्या ठिकाणी नेमणूक झाल्यापासून येथील स्थानिक हिंदु समुदायाला हिंदु रितीरिवाज पाळण्यापासून रोखावे यासाठी स्थानिक ख्रिस्ती नागरिकांना चिथावून घालत आहे, असे भक्तांनी तक्रारीत म्हटले आहे. हा ख्रिस्ती धर्मगुरु (फादर) येथील हिंदू त्यांचे धार्मिक विधी चॅपलच्या अखत्यारित असलेल्या जागेत करतात, असे सांगून ख्रिस्त्यांना चिथावून घालतात.

पोलिसांनी तुळशीवृंदावनाचा उर्वरीत भाग नेल्यावर हिंदूंनी पोलिसांची ही कृती त्या धर्मांध फादरच्या आणि राजकीय दबावाखाली येऊन केलेली अवैध कृती आहे, असा आरोप केला आहे. स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी धार्मिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहनही स्थानिक पोलिसांना केले आहे. घटनेच्या ठिकाणाहून तुळशीवृंदावनाचा उर्वरीत भाग नेऊन हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर गदा आणण्याचा पोलिसांना कोणताही अधिकार नाही. पोलीस आणि गोवा सरकार यांची ही कृती अवैध असल्याने सोमवार २९ एप्रिलला स्थानिक हिंदू न्यायालयात दाद मागणार आहेत. या वेळी न्यायालयाकडे गोवा सरकार आणि स्थानिक फादर यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF