कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील ज्यूंच्या प्रार्थनास्थळामध्ये झालेल्या गोळीबारात १ जण ठार

कॅलिफोर्निया (अमेरिका) – येथील सॅन दिएगोजवळ ज्यू धर्मियांच्या एका प्रार्थनास्थळामध्ये (सिनेगॉगमध्ये) १९ वर्षीय तरुणाने केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला, तर ३ जण घायाळ झाले. गोळीबारानंतर हा तरुण चारचाकीमधून पळून गेला. काही वेळाने त्याने स्वतःच पोलिसांना संपर्क करून ‘मीच हा गोळीबार केला’, असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचे नाव समजू शकलेेले नाही. त्याच्याकडून एक रायफल जप्त करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF