(म्हणे) ‘कलम ३७० रहित करण्याच्या प्रयत्नात असणार्‍यांपासून काश्मीरला सर्वाधिक धोका !’ – ओमर अब्दुल्ला

वास्तविक कलम ३७० रहित करू न देणार्‍यांपासून देशाला धोका असल्यामुळे त्यांना कारागृहात डांबून कठोर शिक्षा केली पाहिजे !

श्रीनगर – पाकिस्तान किंवा बंदूकधारी यांच्यापेक्षाही जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम आणि कलम ‘३५ अ’ (इतर प्रांतातील भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये जमीन घेण्याचा अधिकार नाकारणारे कलम) रहित करण्याचा प्रयत्न करणार्‍यांपासून राज्याला सर्वाधिक धोका आहे, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले. अनंतनाग मतदारसंघातील कुंड घाटी येथे एका सभेला संबोधित करतांना त्यांनी हे विधान केले.

(म्हणे) ‘अमरनाथ बोर्डाला भूमी देऊन ३७० कलम कमकुवत केले !’ – मेहबूबा मुफ्ती

काश्मीरमधील थोडीशी भूमी हिंदूंच्या तीर्थस्थळाला देण्यावरून कलम ३७० कमकुवत होत असेल, तर संपूर्ण काश्मीरच तीर्थस्थळांना देऊन टाकले पाहिजे, मग हे कलमच रहाणार नाही !

ओमर अब्दुल्ला यांच्या विधानाच्या एक दिवस आधी माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी वर्ष २००८ मध्ये अमरनाथ बोर्डाला सहस्रो एकर भूमी देऊन कलम ३७० कमकुवत केले. केवळ पीडीपी हाच एकमेव पक्ष होता, ज्याने भाजपसमवेत युती करत कलम ३७० आणि ‘३५ अ’ यांचा बचाव केला होता.


Multi Language |Offline reading | PDF