युवकांनी शेती व्यवसाय करावा ! – विजय सरदेसाई, मंत्री, गोवा

मडगाव (गोवा) – गोव्यातील ९० युवकांचे मूळ शेतीशी जोडलेले आहे. युवकांना शेती व्यवसाय करण्यास उद्युक्त करणे आवश्यक आहे. गोव्यात २० सहस्र हेक्टर कृषीभूमी आहे. युवकांनी कृषी खात्याचे ‘ब्रँड अम्बसेडर’ बनावे, असे आवाहन गोव्याचे कृषीमंत्री तथा उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. ‘वी फॉर फातोर्डा’ या उपमुख्यमंत्री सरदेसाई यांच्याशी निगडित संस्थेने आयोजित केलेल्या कृषी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या उद्घाटन सोहळ्याला मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षा बबिता आंगले, ‘वी फॉर फातोर्डा’च्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त सौ. उषा सरदेसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी सौ. उषा सरदेसाई यांचेही भाषण झाले.


Multi Language |Offline reading | PDF