पिशवीसाठी ग्राहकांकडून ३ रुपये आकारणार्‍या ‘बाटा’ आस्थापनाला ९ सहस्र रुपयांचा दंड

चंडीगड – येथील बाटाच्या एका दुकानात ग्राहकाने बूट खरेदी केल्यावर त्याला देण्यात आलेल्या पिशवीसाठीही ३ रुपये आकारण्यात आले. या पिशवीमुळे ‘बाटा’ आस्थापनाचेच विज्ञापन होणार होते. यामुळे ग्राहकाने या आस्थापनाच्या विरोधात ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार केली होती. या प्रकरणावर निकाल देताना ग्राहक कक्षाने बाटा आस्थापनाला दोषी ठरवले आणि त्यांच्यावर ९ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी ४ सहस्र रुपये ग्राहकांना देण्यात यावेत, तसेच पर्यावरणाला योग्य अशा पदार्थांपासून बनलेल्या कागदी पिशव्या ग्राहकांना द्याव्यात, असे ग्राहक कक्षाने सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF