अमेरिकेकडून पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तान आणि घाना यांचा निर्बंध सूचीत समावेश !

अमेरिका असे करते, तर भारत का करत नाही ?

वॉशिंग्टन – अमेरिकेतील कायद्याच्या अंतर्गत व्हिसावर प्रतिबंध घालता येणार्‍या जगातील १० देशांच्या सूचीमध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. या कायद्यानुसार निर्बंध असलेल्या राष्ट्रांतील नागरिकांनी व्हिसामध्ये नमूद केलेल्या कालावधीपेक्षा अधिक काळ अमेरिकेत वास्तव्य केल्यास आणि व्हिसा परत देण्यास नकार दिल्यास त्यांचा व्हिसा रहित करण्यात येणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याच वर्षी पाकिस्तान आणि घाना यांचा या सूचीमध्ये समावेश केला आहे. यापूर्वी वर्ष २००१ मध्ये गयाना, कंबोडिया, इरिट्रिया, गिनी आणि वर्ष २०१७ मध्ये म्यानमार आणि लाओस या देशांचाही या सूचीत समावेश करण्यात आला होता. अमेरिकेने वर्ष २०१८ मध्ये ३८ सहस्र पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यास नकार दिला होता. यापूर्वी अमेरिकेने पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाचा ५ वर्षांचा कालावधी न्यून करत ३ मास एवढा केला होता.


Multi Language |Offline reading | PDF