भारतातून आतंकवाद्यांच्या सहभागाविषयी चौकशीस आरंभ

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांचे प्रकरण

देहली – श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमध्ये आतंकवाद्यांना भारतातून साहाय्य मिळाले होते का, याची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआए) करत आहे. या प्रकरणी एन्आयए श्रीलंकेच्या सुरक्षायंत्रणांना सहकार्य करत आहे.

१. दक्षिण आशियात भारत, श्रीलंका आणि बांगलादेश येथे इस्लामिक स्टेटचे (आयएस्चे) अनेक तळ आहेत. मोठ्या प्रमाणात तरुणांचा बुद्धीभेद करून त्यांना इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी करण्याचे काम या आतंकवादी तळांमध्ये करण्यात येत असते.

२. नॅशनल तौहीद जमात या संघटनेच्या साहाय्याने इस्लामिक स्टेटच्या श्रीलंकेत कार्यरत असलेल्या तळांतील आतंकवाद्यांनी हे स्फोट घडवून आणले होते. इस्लामिक स्टेटचा जाहरान हाशीम हा श्रीलंकेतील आतंकवादी या स्फोटांचा सूत्रधार आहे.

३. जाहरान हाशीम याचे व्हिडिओ इस्लामिक स्टेटच्या तमिळनाडूच्या कोइम्बतूर येथे आतंकवादाचे प्रशिक्षण घेणार्‍या जिहादी तरुणांना दाखवण्यात येत होते. तसेच जाहरान हाशीम या आतंकवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती एन्आयएकडे होती. त्यामुळे यासंदर्भात कोइम्बतूर तळातील आतंकवाद्यांशी संबंधित लोकांची अधिक चौकशी करण्यात येणार आहे.

४. याच वेळी इस्लामिक स्टेटच्या केरळमधील आतंकवाद्यांशी या बॉम्बस्फोटांचा काही संबंध आहे का ?, याचे अन्वेषण केले जात आहे. वर्ष २०१६ मध्ये इस्लामिक स्टेटने केरळमधील आतंकवादी प्रशिक्षण केंद्रातील २१ जिहाद्यांना कुराणाचे शिक्षण देण्यासाठी श्रीलंकेत पाठवले होते.


Multi Language |Offline reading | PDF