गोव्यातील काही ख्रिस्ती धर्मगुरूंनी (फादरनी)निवडणुकीत काँग्रेसचे एजंट म्हणून काम केले !-एल्विस गोम्स,आप

पणजी,२५ एप्रिल (वार्ता.)-गोव्यातील काही ख्रिस्ती धर्मगुरूंनी (फादरनी)े निवडणुकीत काँग्रेसचे एजंट म्हणून काम केले आहे,असा आरोप आपचे राज्य समन्वयक तथा पक्षाचे लोकसभेच्या दक्षिण गोवा मतदारसंघाचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला.गोव्यात २३ एप्रिल या दिवशी लोकसभेच्या २ जागांसाठी,तर विधानसभेच्या ३ जागांसाठी पोटनिवडणूक झाली.या पार्श्‍वभूमीवर गोम्स यांनी हा आरोप केला.

एल्विस गोम्स पुढे म्हणाले,मी सर्वच ख्रिस्ती धर्मगुरूंनी (फादरनी)काँग्रेसचा प्रचार केला,असे म्हणणार नाही.अशा प्रकारचे धार्मिक नेते सर्वच धर्मांत आहेत.काही फादरना वाटते की,त्यांनी काँग्रेस पक्षासाठी कार्य केले पाहिजे.असे सुमारे ३ ते ४ फादर आहेत.हे फादर धर्म बाजूला सारून राजकारण करत असतात.मागील आठवड्यात चर्चमध्ये प्रार्थना होत्या.त्या वेळी तेथील फादरने उपस्थित भाविकांना थेट काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.चर्च संस्थेच्या प्रमुखांनी या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे.निवडणुकीत असा प्रकार होऊ नये. (चर्च संस्थेचे प्रमुख फादरनी द्वेषमूलक भाषण केले,तरी त्यांनाच पाठीशी घालतात.जनतेच्या डोळ्यांत माफी मागून धूळफेक करतात.असे चर्च संस्थेचे प्रमुख एका राजकीय पक्षाचा प्रचार केला म्हणून काय नोंद घेणार ?उलट हे प्रमुखच त्यांना तसे करायला सांगतात,असा संशय येतो !-संपादक)

काही दिवसांपूर्वी निवडणुकीचा प्रचार चालू असतांना फादर कॉसेेसांव डिसिल्वा यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि भाजप यांच्यावर द्वेषमूलक टीका केल्याचे चलचित्र (व्हिडिओ)व्हायरल झाले होते.यामुळे चर्च संस्थेला माफी मागावी लागली होती.या प्रकरणी फादर कॉसेसांव डिसिल्वा यांना निवडणूक आयोगाने तंबीही दिली होती.(द्वेषमूलक टीका करणार्‍या फादरना केवळ तंबी देऊन सोडणारा निवडणूक आयोग काय कामाचा ?निवडणूक आयोग या पलिकडे काही करू शकत नाही,हे आचारसंहिता भंग करणार्‍या लोकशाहीद्रोह्यांना ठाऊक आहे.त्याचाच ते लाभ उठवतात !-संपादक) गोव्याचे आर्च बिशप फादर फिलीप नेरी फेर्राव यांनी निवडणुकीच्या २ दिवस आधी समाजात दुफळी माजवणारे धर्मांध (कम्यूनल)आणि भ्रष्टाचार न करणारे यांना मतदान न करण्याचे आवाहन केल्याने त्यावरूनही राज्यात गदारोळ माजला होता.(असे आर्च बिशप असल्यावर फादर द्वेषमूलक न बोलल्यासच नवल !-संपादक)


Multi Language |Offline reading | PDF