श्रीलंका येथील चर्चमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा गोव्याचे आर्च बिशप यांच्याकडून निषेध

पणजी,२५ एप्रिल (वार्ता.)-श्रीलंका येथे चर्चमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा गोव्याचे आर्च बिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी निषेध केला आहे.या आक्रमणाचा निषेध करण्यासाठी येत्या रविवारी गोव्यातील विविध चर्चमधून मेणबत्ती पेटवून,तसेच विशेष प्रार्थना सभा घेण्यात येणार आहे.आर्च बिशप फेर्राव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.(चर्चमध्ये झालेले आक्रमण हे इस्लामी आतंकवादी संघटनेने केलेले आक्रमण आहे;परंतु हिंदूंना मूलतत्त्ववादी, कट्टरतावादी, कम्युनल म्हणणारे इस्लामविषयी चकार शब्द बोलू धजत नाहीत,हे लक्षात घ्या ! कारण हिंदू मूलतत्त्ववादी,कट्टरतावादी,कम्युनल नसल्याने त्यांचे काही बिघडवणार नाहीत,तर धर्मांधांविषयी बोलल्यास जगणे कठीण होऊन जाईल,हे त्यांना ठाऊक आहे.-संपादक)

 


Multi Language |Offline reading | PDF