मसूद अझहर भारतात आतंकवादी आक्रमण करण्यासाठी पुन्हा सक्रीय

  • गेल्या १७ वर्षांत कधीही आजारी पडलो नसल्याचे सांगत मसूद अझहर याचा पाकला घरचा अहेर !
  • पाकच्या कोणत्याही वक्तव्यावर अथवा आश्‍वासनावर विश्‍वास ठेवणे; म्हणजे राष्ट्रघात आहे ! हे जाणून भाजपचे शासनकर्ते त्याला कायमची अद्दल घडवतील तो सुदिन !
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ निवडणुकीत आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केल्याचा प्रचार न करता त्यांचा समूळ नाश करण्याची कृती करून दाखवली पाहिजे !

नवी देहली – बालाकोट येथे जैश-ए-महंमदच्या प्रशिक्षण केंद्रावर भारताने केलेल्या कारवाईनंतर जैशचा प्रमुख मसूद अझहर पुन्हा भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी सक्रीय झाला आहे. त्याने काही दिवसांपूर्वी जैशच्या आतंकवाद्यांसमवेत बहावलपूर येथे एक बैठकही घेतली. त्या वेळी तो म्हणाला, ‘‘गेल्या १७ वर्षांत मी कधीही आजारी पडलेलो नाही किंवा रुग्णालयात भरती झालेलो नाही.’’ त्याच्या या विधानावरून पाकचा खोटारडेपणा उघड झाला आहे. पुलवामा येथील आक्रमणानंतर भारताने मसूद याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तेव्हा पाकचे विदेशमंत्री महमूद कुरेशी यांनी ‘तो मूत्रपिंडाच्या आजारामुळे रावळपिंडी येथील सैन्य रुग्णालयात उपचार घेत आहे. भारताने त्याच्यावर केलेले आरोप खोटे आहेत’, असे सांगितले होते.


Multi Language |Offline reading | PDF